पुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून पोलिसांना ई-मेल …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । ‘बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या मुंबईतील वांद्रेतील घरी बॉम्ब आहे. पुढील दोन तासात त्याचा स्फोट होईल’ अशी खळबळजनक माहिती नुकतंच मुंबई पोलिसांनी ईमेलद्वारे मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सलमानच्या घरी धाव घेतली. मात्र पोलिसांनी सलमानकडे कोणतीही संशयास्पद वस्तू न सापडल्याने हा मेल खोटा असल्याचे पोलिसांना लक्षात आले. उत्तरप्रदेशातील गाझियाबाद या ठिकाणाहून हा मेल पाठवण्यात आला होता. हा मेल पाठवणाऱ्या 16 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर रोजी वांद्रे पोलिसांना एक मेल मिळाला. त्यात ‘सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरी बॉम्ब आहे. पुढील दोन तासांत त्याचा स्फोट होईल. रोक सकते हो तो रोक लो.’ असा मेल आला होता.

हा मेल आल्यानंतर पोलिस विभागाने तातडीने बॉम्ब निकामी पथकासह सलमानच्या घरी रवाना झाले. ज्यावेळी पोलिस सलमानच्या घरी पोहोचले, तेव्हा सलमान तिथे उपस्थित नव्हता. त्यानंतर पोलिसांनी सलमानचे वडील सलीम खान, आई सलमा खान, बहीण अर्पिता खान यांना सुरक्षित बाहेर काढले. यानंतर पोलिसांनी संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. तब्बल 4 तास सलमानच्या घराची शोधाशोध केल्यानंतर पोलिसांनी एकही संशयास्पद वस्तू सापडली नाही.

यानंतर पोलिसांना हा मेल खोटा असल्याचे समजलं. पोलिसांनी मेल करणाऱ्या व्यक्तीची शोधाशोध सुरु केल्यानंतर हा मेल गाझियाबादमधून आल्याची माहिती समोर आली. ज्यावेळी पोलिस मेल करणाऱ्या व्यक्तीच्या घरी पोहोचली. तेव्हा तो तरुण फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन आरोपीला घरी बोलवण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Leave a Comment