सांगली | उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद सातारा, सांगली भागात पडताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शुक्रवारी (17 जानेवारी) सांगली बंदचं आवाहन केलं आहे.
उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच संभाजी भिडे यांनी सांगली बंदच आवाहन केले आहे. संजय राऊत यांना पदावरुन हटवावे अन्यथा बंद यापुढेही कायम राहील असा इशाराही संभजी भिडे यांनी दिला.
काय आहे प्रकरण?
आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. लोकमत पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभात घेतलेल्या मुलाखतीत शिवाजी महाराजांच्या वंशजांनी वंशजाचे पुरावे द्यावेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.त्यांच्या या टिकेवरून उदयनराजे समर्थक आक्रमक झाले आहेत.