देशाला भारत म्हणून नाही तर हिंदुस्थान म्हणून जगण्यासाठी शिवसेना आवश्यक- संभाजी भिडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । “या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे? प्राणीमात्रांनी जीवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे, तसं या या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल, भारत म्हणून नाही, तर शिवसेना आवश्यक आहे” असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते.

“गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा पाहिजे. लोकसेवक तत्पर पाहिजे. हा प्रवाह अखंड चालू राहिल पुढे यासाठी खटपट केली पाहिजे.पद, पैसा, स्थान, मोठेपण हे शुल्लक आहे. आपल्याला संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणून या देशाच्या नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे. हे लक्षात ठेऊन काम करुयात. हे काम शिवसेनेच्या कार्यातूनच होऊ शकतं असं माझं स्वतःचं मत आहे,” असंही संभाजी भिडे यांनी नमूद केलं.

यावेळी सांगलीतील एका चौकाचं नामकरणही करण्यात आलं. याचाच संदर्भ घेत संभाजी भिडे म्हणाले, “आज मोठी आनंदाची गोष्ट आहे. फार विलंब झालेली चांगली गोष्ट आज होतेय. हे नामकरण 25 वर्षांपूर्वीच व्हायला हवं होतं, ते आज होतंय. जे नामकरण होतंय त्या बाळासाहेब ठाकरेंची जी आशा आकांक्षा होती की संपूर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी. चौकाचं नामकरण होईल, पण कामाचं काय? या सांगली गावात शिवसेनेच्या 200-250 शाखा का नाहीत? हे दुःख घेऊन आपण जाऊयात. हे दुःख आपण कार्यन्वित करुयात.”

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment