झेंड्यावर राजमुद्रा वापरल्यामुळे संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंच्या विरोधात सोनपेठ पोलिसांत तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

मनसेच्या नव्या झेंड्यांवरून वादाला तोंड फुटले असून, झेंड्यावर वापरण्यात आलेल्या राजमुद्रेवर आक्षेप घेत आता शिवप्रेमींकडून विरोध होऊ लागला आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्याची आणि प्रशासकीय कारभाराची प्रतिनिधित्व करणारी ही राजमुद्रा असून रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. तिचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करणे चुकीचे असुन प्रांत, भाषा, जात आणि धर्म यावर आधारित राजकारण करणाऱ्या मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सदरील राजमुद्रेचा वापर करण्याचा त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला कोणताही नैतिक अधिकार नाही. असं असतानाही त्यांनी त्यांच्या पक्षाचा झेंड्यावर राजमुद्रेचा वापर केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी मनसे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तात्काळ कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असं निवेदन परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना सोनपेठचे पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत देण्यात आलं आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कदम यांच्यासह प्रकाश भोसले, मुरलिधर पायघन, सुरेश भोसले, व्यंकटराव सपकाळ, बाळासाहेब रोजे, भगवान भंडारे महादेव भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

भाजपा सरकारच्या काळातील वरिष्ठ नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू – गृहराज्यमंत्री सतेज पाटील

शरद पवारांचा शहरी नक्षलवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न – विनोद तावडे

जगातील सर्वात मोठी लोकशाही पंतप्रधान मोदी नष्ट करत आहेत; साप्ताहिक द इकॉनॉमिस्टची जहरी टीका