हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. शिवनेरीवर मात्र माजी खासदार संभाजी छत्रपतींनी आक्रमक पावित्रा घेत थेट मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर उभे राहत त्यांना आव्हान दिले. त्याच्या आक्रमक पावित्र्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले असून आज त्यांनी त्यांच्या मिशन 2024 ची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन राजकीय पर्याय देण्यासाठी संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांच्या ‘स्वराज्य’च्या पदाधिकाऱ्यांची यादी फेसबुक पोस्टद्वारे प्रसिद्ध केली आहे.
संभाजी राजे यांनी आज त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक फेसबुक पोस्ट केली असून त्या माध्यमातून त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये मिशन 2024 साठी प्रमुख शिलेदार, असा उल्लेख करण्यात आलेला आहे.
स्वराज्य संघटनेमध्ये डॉ.धनंजय जाधव सरचिटणीस आणि करण गायकर संपर्क प्रमुख असतील. तर संघटनेमध्ये 6 उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसह 60 राज्य कार्यकारिणी सदस्यही आहेत. 2022 पर्यंत संभाजी राजे हे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार होते, यानंतर त्यांची पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली नाही.
https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/734806068016550
राज्यसभा निवडणुकीमध्ये संभाजी राजे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारीही केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तसेच आपण महाराष्ट्रात नवा राजकीय पर्याय देऊ, असे सांगत स्वराज्य संघटनेची स्थापना केली.