हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शहराच्या नामांतरानंतर औरंगाबाद शहराचं नाव ‘संभाजीनगर’ करण्यात आले. यावरून राजकारण केले जात असून समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी नुकतेच एक खळबळजनक विधान केले. त्यांच्या विधानावरून छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे जोरदार टीका केली आहे. “औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राहण्याचा अधिकार नाही. अशा व्यक्तीला सर्वात आधी महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे,”असे त्यांनी म्हटलं आहे.
संभाजीराजे यांनी नुकतेच एक ट्वीट केले असून त्यामध्ये त्यांनी लिहले आहे की, “औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राहण्याचा अधिकार नाही. अबू आझमी महाराष्ट्रात का राहतायत? अशा व्यक्तीला सर्वात आधी महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.
औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे,तर देशात राहण्याचा अधिकार नाही. pic.twitter.com/f2pwV2lOiE
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 7, 2022
अबू आझमी काय म्हणाले होते?
औरंगजेब बादशाह वाईट माणूस नव्हता. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. जर त्यांचा खरा इतिहास समोर आला तर हिंदू नाराज होणार नाहीत. देशभरात अनेकांची नाव औरंगजेब आहेत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांची नावं मुस्लीम व्यक्तीच्या नावावरुन आहेत. या जिल्ह्यांची नाव बदलल्यानं कोणाला नोकऱ्या मिळणार नाहीत. महागाई कमी होणार नाही. जर ही नाव बदलून तरुणांना नोकऱ्या मिळणार असतील तर मी या बदलाचं स्वागत करेन, असे आझमी यांनी म्हंटले आहे.