नाशिकमधील दुगारवाडी धबधब्यावरून 10 तासांनंतर 20 पर्यटकांची सुटका, तर एकजण गेला वाहून!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – राज्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यादरम्यान अचानक आलेल्या पावसाने दुगारवाडी धबधब्यावर (Dugarwadi Falls) फिरण्यासाठी आलेले 20 हून जास्त पर्यटक अडकले.तर या पावसात एक पर्यटक वाहून गेला. नाशिकमध्ये दमदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे दुगारवाडी धबधब्यावर (Dugarwadi Falls) पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात दुगारवाडी धबधब्यावर (Dugarwadi Falls) आले होते. मात्र यादरम्यान अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला आणि पर्यटकांची एकच कोंडी झाली. यामुळे त्या ठिकाणी 20 हुन अधिक पर्यटक त्याठिकाणी अडकले होते. या पावसामुळे कुणालाही धबधब्यावरून (Dugarwadi Falls) बाहेर पडणे मुश्किल झाले होते. यावेळी अडकलेल्या पर्यटाकांपैकी अविनाश गरड नावाचा पर्यटक वाहून गेला.

दुगारवाडी धबधब्यावर (Dugarwadi Falls) अनेक पर्यटक अडकल्याची माहिती रेस्क्यु टीमला समजताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा पर्यंत पर्यटकांना रेस्क्यु करण्याची कारवाई सुरु होती. भर पावसात तब्बल 10 तास हे रेस्क्यु ऑपरेशन सुरू होते. यानंतर रात्रभर बचाव मोहिम राबवून सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश मात्र यामधील एक वाहून गेल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?