हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून यासंदर्भात तोडगा निघण्यासाठी आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी संभाजी छत्रपती यांना बहुजन समाजाचं नेतृत्व करण्याचं आवाहनच केलं. तसेच मराठा आरक्षण टिकवण्यासाठीचा महत्त्वाचा उपायही सांगितला
मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं, दुसरं म्हणजे ही याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणं. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.
मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचं नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे,” अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मांडली. आरक्षण हा व्यवस्थेशी जोडण्याचा भाग आहे. संभाजीराजेंशी चर्चा करत असताना आरक्षणावर चर्चा झाली. पण हा प्रश्न पुढे न्यायचा असेल तर राजसत्तेची गरज आहे, हा विचार पुढे आला. या चर्चेचा हा मुख्य गाभा आहे, असं ते म्हणाले.
प्रसिद्ध अभिनेत्रीचा ‘या’ माजी मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
क्या हुआ तेरा वादा….जयंतराव जी; जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांनी साधला निशाणा
साताऱ्यात उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पत्रकारांच्यात खडाजंगी