आम्हाला न्याय द्या !! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी सुचवले ‘हे’ 3 पर्याय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून यासंदर्भात तोडगा निघण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटी घेऊन अखेर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा असे संभाजीराजे यांनी म्हंटल.

मराठा समाज आज अस्वस्थ आहे, आज माझ्यामुळे समाज शांत आहे. त्यांना उद्रेक करता येतो. त्यांनी रस्त्यावर उतरायचं का? यापुढे चालणार नाही. आम्ही चालूच देणार नाही. म्हणून पर्याय द्यायला हवा. आम्हाला तुमच्या राजकीय भांडणात अजिबात रस नाही. आम्हाला न्याय द्या”, असं संभाजी राजे छत्रपती यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी मराठी आरक्षणासाठी सरकारसमोर तीन पर्याय सूचवले.

तीन पर्याय कोणते

पहिला पर्याय: राज्य सरकारने तात्काळ रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. हा राज्य सरकारचाच विषय.

दुसरा पर्याय: रिव्ह्यू पिटीशन टिकलं नाही तर क्युरिटिव्ह पिटीशन दाखल करावी. हा शेवटचा पर्याय आहे. पण हा पर्याय अपवादात्मक आहे. त्यासाठी भक्कम पुरावे घेऊनच कोर्टात जावं लागणार आहे.

तिसरा पर्याय: ‘342 अ’ च्या माध्यमातून आपण प्रपोजल केंद्राकडे देऊ शकतो. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment