स्वराज्य संघटनेचं चिन्ह आणि झेंड्याचा रंग कोणता?? संभाजीराजेंनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीराजे यांनी आज आपल्या पुढील राजकीय वाटचालीची माहिती देत नव्या संघटनेची घोषणा केली. स्वराज्य असं त्यांच्या संघटनेचं नाव असून आपली ताकद ‘स्वराज्य’मार्फत सगळीकडे पोहोचवायची आहे असं संभाजीराजे यांनी म्हंटल. त्यांच्या या स्वराज्य संघटनेचं चिन्ह नि झेंडयाचा रंगाबाबत विचारलं असता त्यांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

संभाजीराजे म्हणाले, स्वराज्य संघटनेचं चिन्हं अजून ठरवलं नाही, रंगही ठरलेला नाही. आता महाराष्ट्राचा दौरा करत जाऊ तसं लोकं सांगतील, की हे चिन्ह घ्या, हा रंग घ्या. पण आपल्या रक्तात आणि हृदयातील केशरी पट्टा तर कोणी काढून घेऊ शकत नाही. संभाजीराजे यांच्या या उत्तराने उपस्थितांची मने जिंकली.

लोकांची मागणी होती की, राजे वेगळा पक्ष स्थापन करावा, तिसरी आघाडी स्थापन करावी. परंतू माझा राजकीय वाटचालीचा पहिला टप्पा हा स्वराज्य संघटित करण्याचा असणार आहे. ही संघटना, हे स्वराज्य उद्या राजकीय पक्षात रुपांतरीत झाले तरी त्यात वावगे समजू नये. माझी त्यासाठी तयारी आहे.असे संभाजीराजे यांनी म्हंटल.