हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. संभाजीराजेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस सुरु असून याच दरम्यान संभाजीराजेंती तब्येत बिघडली आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे. तसेच साखरेची पातळीत घट झाला आहे.
मात्र संभाजी राजे यांनी औषध घेण्यास नकार दिला असल्यामुळे काळजी वाढली आहे. डॉक्टरांच्या टीमने तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी औषध देण्याचा प्रयत्न केला परंतु उपोषणावर ठाम असल्यामुळे राजेंनी स्पष्ट नकार दिला आहे.
डॉक्टर म्हणाले, गेल्या 60 तासांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. त्यांची शुगर आणि ब्लड प्रेशर कमी झाले आहे. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी ते देखील घेण्यास नकार दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. यानंतर मराठा समन्वयक वर्षावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मराठा समन्वयक यांच्यामध्ये बैठक सुरु झाली आहे. लवकरात लवकर याविषयी तोडगा निघावा ही अपेक्षा आहे.