हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा खासदारकी संपुष्टात आल्यानंतर छत्रपती संभाजीराजे नेमकी कोणत्या मार्गाने आगामी वाटचाल करतील किंवा कोणत्या पक्षात जातील याबाबात चर्चा रंगल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत नव्या संघटनेची स्थापना केली, स्वराज्य संघटना असं त्यांच्या संघटनेचं नाव आहे. स्वराज्याच्या नावाखाली लोकांना संघटित करण्यासाठी आज मी स्वराज्य संघटनेची स्थापना करतो अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली.
मी राज्यसभा खासदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे असं संभाजीराजे यांनी यावेळी स्पष्ट केलं. सर्वपक्षीयांनी मला पाठिंबा देऊन राज्यसभेत पाठवावे असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. आजपासून मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.
कित्येक वर्षे महाराष्ट्रातील लोकांनी छत्रपती घरण्यावर प्रेम केलं. या प्रेमापोटी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आपली ताकद ‘स्वराज्य’मार्फत सगळीकडे पोहोचवायची आहे, ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यासाठी माझी तयारी आहे.असे संभाजीराजे यांनी म्हंटल