व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today : सोने महागले, तर चांदीच्या किंमतीत घसरण; पहा आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Price Today) चढ उतार पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी म्हणजेच 12 मे 2022 रोजी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून चांदीच्या किंमतीत मात्र घसरण झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 0.05 टक्क्यांनी वाढली आहे. त्यानुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 50,848 रुपये झाली आहे.

तर दुसरीकडे, चांदीच्या दरात (Gold Price Today) मात्र घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आज MCX वर आज चांदीचा भाव 351 रुपयांनी कमी झाला आहे. चांदीच्या दरात 0.58 टक्क्यांनी घसरण झाली असून त्यानुसार प्रतितोळा चांदीची किंमत 60,550 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे : (Gold Price Today) 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,590 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,490 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,590 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे (Gold Price Today) दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

हे पण वाचा :

e-shram card : खुशखबर !!! आता ई-श्रम कार्डधारकांना घर बसल्या मिळणार; हे फायदे

Cardless Cash Withdrawl : आता डेबिट क्रेडिट काशिवाय काढता येणार कॅश, संपूर्ण प्रक्रिया पहा

JioPos Lite App : Jio Recharge द्वारे घर बसल्या पैसे कमावण्याची संधी !!!

Stock Market : ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, एका वर्षात दिला 172% रिटर्न

Gold Price Today : दोन महिन्यांत सोने 5 हजार रुपयांनी झाले स्वस्त, तरीही खरेदी का होत नाही ???