हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून ते राज्यभर दौरा करत आहेत पण भाजपात राहून खासदारकी ठेवायची आणि आंदोलन करायचं ही दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. छत्रपती संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीला लाथ मारायला हवी असं मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे.
केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती केली तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. त्यामुळे खासदार छत्रपती संभाजीराजेंनी भाजपकडे कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी करावी. नसता, त्या पेक्षा ते जी गादी सांभाळत आहेत, ती श्रेष्ठ आहे. त्यासाठी त्यांनी भाजपच्या खासदाकीला लाथ मरायला हवी, असे मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे.
येत्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी दिल्लीत धरणं आंदोलन करणार असून संभाजीराजेंनी या आंदोलनात सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या भूमिकेवर छत्रपती संभाजीराजे काय मत मांडतात हे पाहणं गरजेचे आहे.