सातारा जिल्ह्यात ३ मे नंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडणार? शंभूराज देसाईंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या ७७ वर गेली आहे. यामुळे जिल्ह्यातील लाॅकडाउन कडक करण्यात आले असून अनेक ठिकाणी जीवणावश्यक वस्तु मिळणे कठीण झाले आहे. यापार्श्वभुमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील दुकाने नियम पाळून किमान 3 तास उघडावीत अशा सुचना सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिल्या आहेत.

सातारा जिल्हा सध्या रेड झोनमध्ये आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या चार पाच दिवसापासून संपुर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन अतिशय कडक पध्दतीने राबविले जात आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक सुविधा मिळणे कठीण झाले आहे. याकरीता जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात जीवनावश्यक सुविधा घरपोच देण्याची व्यवस्था करावी तसेच ज्याठिकाणी घरपोच सुविधा देणेस वाव नाही अशा ठिकाणी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून सामाजीक अंतर ठेवून दुसर्‍या टप्प्यात सकाळी किमान ३ तास जीवनावश्यक साहित्यांची दुकाने उघडी ठेवावीत अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना आज केल्या.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी वरील महत्वाच्या विषयासंदर्भात आज सगळा प्रोटोकॉल (राजशिष्टाचार) बाजुला ठेवून सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जावून प्रत्यक्ष भेट घेतली. या महत्वाच्या विषयासंदर्भात त्यांनी सुमारे एक तास जिल्हाधिकारी यांचेबरोबर चर्चा केली. यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवरती लॉकडाऊनच्या काळात शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करुन देणेकरीता जिल्हयातील सर्व अधिकारी यांची बैठक घेवून यासंबधीचा आराखडा तयार करुन आवश्यक त्या उपायायोजना केल्या जातील असे सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या –

रेड झोनमधील मद्यपींसाठी खुशखबर! कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार?

कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला? जाणून घ्या पहिल्या रुग्णापासून आजच्या ५७ पर्यंतचा पूर्ण प्रवास

शरद पवांरांचे पंतप्रधान मोदींना पत्र; IFSC सेंटर महाराष्ट्रातू गुजरातला हलवण्यावर म्हणाले…

Breaking | आणखी दोन कैद्यांना कोरोनाची बाधा, साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७७ वर

उदयनराजे भोसले यांनी ठोकला पत्रकारांना सलाम, म्हणाले…

You might also like