सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरात शंभरहून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या मटका किंग समीर कच्छी याच्या टोळी विरुद्ध सातारा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मटकाकिंग समीर कच्छीसह त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का लावण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा पोलिसांकडून मोक्का अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. यावेळी समीर शेख म्हणाले की, सातारा येथील समीर कच्छी याच्या टोळीवर पोलिसांच्यावतीने नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्हयामध्ये समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी हा त्याच्या कच्छी गैंग च्या साथीदारांच्या मार्फतीने लपुन छपुन पोलिसांच्या नजरेआड राहून मटका / जुगार सारखे अवैध धंदे चालवत होता. तसेच मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करुन तो सामान्य कुटुंबातील गरजू लोकांना व्याजाने पैसे देऊन लोकांची पिळवणूक करीत असल्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या.
लोकांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित टोळीवर कारवाई करण्यासाठी खास पथक तयार करण्यात आले. तसेच पथकास कारवाई करण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचुन दि.१९ फेब्रुवारी रोजी सगीर कच्छी याच्या मोळाचा ओढा येथील राहत्या घरी छापा टाकला. यावेळी संबंधित ठिकाणी समीर कच्छी व त्याचे साथीदार मटका/जुगार चालवित असताना आढळून आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेत त्यांच्याकडून १६ लाख २६ हजार ७० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तसेच त्यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1274154226553110
सदर गुन्हयाचा तपास केला असता तपासामध्ये समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी व त्याचे साथीदारांनी कच्छी गंग नावची टोळी तयार केली होती. तसेच या टोळीकडून सातारा जिल्हयामध्ये मटका जुगार व्यवसायातून मोठया प्रमाणात मिळणारा काळा पैसा गरजु लोकांना दिला जात होता. तसेच त्यांचेकडून व्याजापोटी जास्त रक्कम वसुल करुनआर्थिक पळवणुक करुन, व्याजाचे पैसे न दिल्यास टोळीच्या माध्यमातून पैशाकरीता अपहरण करून, मारहाण केली जात होती. याबाबत तकार प्राप्त झाल्यानंतर संबंधित टोळीविरुद्ध भा.दं.वि.सं. कलम ३९५, २९७, २६२, २४, ३६५, ४५२, २२२, ५०४, ५० ४२०, ३५४, १०९, सह सावकारी अधिनियम कलम ३९,४५ धिड फंड अॅक्ट कलम ७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवा राज्यात छापा
यावेळी समीर कच्छी टोळीबाबत सातारा पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता समीर कच्छी याच्या कच्छी टोळीचे सातारा जिल्हयाबरोबर गोवा राज्यातील लोकांशी मटका/जुगार कनेक्शन असल्याचे समोर आपले. यावेळी पोलिसांनी तपासाची सुत्रे जलद गतीने फिरवुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोवा राज्यात पाठविण्यात आले. संबंधित पथकाने महगांव येथे छापा टाकला असता समीर कच्छी व त्याच्या टोळीचे कनेक्शन गोव्यातही असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी त्याठिकाणी असलेल्या लोकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.