सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून रविवार, दि. 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी सातारा पोलिसांबरोबर राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काही ठिकाणी महाविकास आघाडी आणि युती सरकारकडून स्थानिक पातळीवर उमेदवारांचे पॅनल उभे करण्यात आले आहे. या पॅनेलच्या माध्यमातून राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. ग्रामपंच्यात निवडणुकीत आपलाच विजय व्हावा यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षातील कार्यकर्त्याकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. दरम्यान, अत्यंत चुरशीच्या होत असलेल्या जिल्ह्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/850071429565338
बंदोबस्तासाठी सातारा जिल्ह्यातील पोलिसांबरोबर राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.