समीर वानखेडे लाचखोरी प्रकरणाचा तपास विश्वास नांगरे-पाटलांकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ड्रग्ज प्रकरणी तपास करणाऱ्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची आर्यन खान प्रकरणात लाचखोरीच्या आरोपाबाबत दक्षता पथकाने बुधवारी चार तास चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आता दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला जाणार आहे. तशा स्वरूपाचे आदेशही नांगरे पाटील यांनी दिले.

मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार या प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपी दिलीप सावंत करणार आहेत. या प्रकरणातील चौकशीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी आझाद मैदान, कुलाबा पोलीस स्थानकातील प्रत्येकी एक तसेच मुंबई पोलिसांच्या एनसीबीचे एक व अन्य एक अधिकारी सायबर सेलमधील आहेत.

दरम्यान, समीर वानखेडे यांचीही चौकशी केली जात आहे. दिल्ली येथे नुकतेच त्यांना बोआलावण्यात आले होते. त्या ठिकाणीही वानखेडे यांची चौकशी करण्यात आली आहे. एकंदरीत ड्रग्ज प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

Leave a Comment