हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूर- मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात (Samruddhi Mahamarg Accident )झाला आहे. वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. मिनी बस आणि ट्रकच्या या भीषण अपघातात तब्बल 10- 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
कसा झाला अपघात Samruddhi Mahamarg Accident
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथील इंद्रानगर येथील 35 भाविक खाजगी टॅम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना समृद्धी महामार्गावर अगरसायगाव परिसरात हा भीषण अपघात झाला. समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनी एक ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते. त्याच वेळेस मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, मिनी बसचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे.
दरम्यान, या भीषण अपघाताची (Samruddhi Mahamarg Accident) माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केलं आहे. सर्व जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात तसेच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहेत.