हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघाताचे (Samruddhi Mahamarg Accident) सत्र सुरूच आहेत. शासनाकडून अनेक उपाययोजना करूनही समृद्धी महामार्गावरील अपघात काही केल्या थांबायचं नाव घेईना. समृद्धी महामार्गावर असाच एक अपघात पाहायला मिळाला. कारला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या गाडीने धडक दिली त्या गाडीचा चालक घटनस्थळावरून फरार झाला आहे.
सर्व मृत व्यक्ती छत्तीसगडचे – Samruddhi Mahamarg Accident
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज सकाळी बुलढाणा हद्दीत मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 304 येथे अपघात घडला. अपघात इतका भीषण होता कि ३ जणांचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहेत. लताबाई पुरुषोत्तम मेहेर, मुकेश अनुज राम मेहेर आणि अत्मजा मुनोरबोद असे या अपघातात मृत्युमुखी पावलेल्या प्रवाशांची नावे असून हे सर्वजण छत्तीसगड येथील रहिवासी आहेत. जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु आहे.
या अपघातानंतर धडक देणारा वाहन चालक फरार झाला आहे. पोलिसांनी याअज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. हा महामार्ग सुरु झाल्यापासून सतत अपघाताच्या घटना (Samruddhi Mahamarg Accident) याठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनेक उपाय योजना करूनही हे अपघाताचे सत्र काय थांबायचं नाव घेईना. सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी आतापर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.