हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूर ते मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एकूण 701 किलोमीटरचा असून यातील 568 किलोमीटर भाग सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आलेला आहे. समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत 50 लाख पेक्षा अधिक वाहनांनी प्रवास केला असून या महामार्गामुळे प्रवाशाचा वेळ वाचत आहे. मात्र जेव्हापासून हा महामार्ग सुरु झाला आहे तेव्हापासून या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची तो चर्चेत राहिला आहे. आत्तापर्यंत सम्रुद्धी महामार्गावर तब्बल 1000 पेक्षा अधिक अपघात झालेले आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आता MSRDCA हे अपघात रोखण्यासाठी नवी युक्ती वापरली आहे.
समृद्धी महामार्गावर बसवणार कृत्रिम हिरवळ – (Samruddhi Mahamarg)
समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) प्रवास करताना महामार्ग संमोहनामुळे अनेक अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महामार्गावर अनेक जणांना जीव देखील गमवावा लागला आहे. वाहन चालकांना महामार्ग संमोहनामुळे आपला जीव गमवावा लागू नये व महामार्गांवरील अपघात कमी व्हावेत ह्या दृष्टिकोनातून MSRDCA ने समृद्धी महामार्गांवर कृत्रिम झाडे, कृत्रिम फुले व विविध पुतळे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. ह्यातून चालक अलर्ट राहून समृद्धी महामार्गांवरील महामार्ग संमोहनामुळे होणारे अपघात कमी होतील अशी आशा MSRDCA ला आहे.
सध्या कृत्रिम पद्धतीची सजावट वैजापूर ते सिंदखेडराजा या मार्गांवर करण्यात येणार आहे.कारण ह्या मार्गांवर आत्तापर्यंत 1258 अपघात नोंदवण्यात आलेले आहेत. त्यासाठीचे कॉन्ट्रॅक्ट देखील MSRDCA च्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे. हा संपूर्ण प्रकल्प हिंगोली जिल्ह्यातील गणराज डेव्हलपर्सला देण्यात आला असून, उपकंत्राटदार म्हणून वैजापूर येथील मेघराज शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याचबरोबर (Samruddhi Mahamarg) समृद्धी महामार्गावर दर 5 किमीवर रंबल पट्ट्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, पट्ट्या सुमारे 10 किमी अंतरावर आहेत. याशिवाय वाहनचालकांना सतर्क राहण्यासाठी कॅरेजवेवर शिल्पे उभारली जातील. त्याचबरोबर महामार्गांवर परावर्तित टेप, सोलर ब्लिंकर जागोजागी बसवण्यात येणार आहेत. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता निश्चित केली जाईल.