हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राच्या समृद्धीत भर टाकणारा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या बातम्यांनी चर्चेत असतो. परंतु याच सम्रुद्धी महामार्गाने टोल वसुलीच्या माध्यमातून (Samruddhi Mahamarg Toll) मात्र भरपूर कमाई करून दिली आहे. मागील 9 महिन्यात 250 कोटी रुपयांचे उत्पन्न समृद्धी महामार्गामुळे मिळालं असून यादरम्यान 50 लाख वाहनांनी प्रवास केला आहे.
सध्या नागपूर पासून ते नाशिकमधील भरवीरपर्यंत हा महामार्ग खुला करण्यात आलेला आहे. खुल्या असलेल्या मार्गात जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी सारखे महत्वाची ठिकाणे जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढत असून भविष्यात देखील समृद्धी महामार्ग पुर्ण खुला झाल्यास ही वर्दळ मोठ्या संख्येने वाढणार आहे यात तिळमात्र शंका नाही. गेल्या ९ महिन्यात समृद्धी महामार्गावरून जवळपास 50 लाख वाहनांनी प्रवास केला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी आता समृद्धी महामार्गामार्फत उत्पन्नाचा स्त्रोत सुरू झाल्याचं चित्र आहे.
वाहनांकडून तब्बल 250 कोटी रुपये उत्त्पन्न प्राप्त : Samruddhi Mahamarg Toll
समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी प्रवास केलेल्या किलोमीटर नुसार टोल आकरण्यात येतो. यामार्फत समृद्धीवर गेल्या 9 महिन्यांपासून टोलची वसुली (Samruddhi Mahamarg Toll) करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जाहीर केलेल्या माहितीनुसार समृद्धीवरून प्रवास केलेल्या 50 लाख वाहनांकडून तब्बल 250 कोटी रुपये उत्त्पन्न प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जाहीर केल्यानुसार महिनावारी टोल वसुलीची आकडेवारी देण्यात आली आहे.
डिसेंबर 2022 : 13,17,72,312 रुपये
जानेवारी 2023 : 28,53,23,483 रुपये
फेब्रुवारी 2023 : 30,47,51, 967 रुपये
मार्च 2023 : 34, 23,03, 220 रुपये
एप्रिल 2023 : 33, 20, 28, 984 रुपये
मे 2023 : 36, 48, 40, 721 रुपये
जून 2023 : 39, 54, 01, 136 रुपये
जुलै 2023 : 29, 12, 01, 38 रुपये