हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोन कंपनी सॅमसंग लवकरच भारतात Samsung Galaxy F04 लॉन्च करणार आहे. जर आपल्याला कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर सॅमसंगचा हा फोन चांगला पर्याय ठरू शकेल. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम आणि ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात येईल. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग पुढील आठवड्यात भारतात हा फोन लॉन्च करण्याची शक्यता आहे.
एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये हा फोन लॉन्च केला जाऊ शकतो. किंमती बाबत बोलायचे झाल्यास Samsung Galaxy F04 हा फोन 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच या फोनमध्ये ग्रीन आणि पर्पल कलर मिळू शकतील.
फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy F04 या फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेट असलेला 6.5-इंचाचा एचडी प्लस डिस्प्लेबरोबरच दिला जाऊ शकेल. तसेच या डिस्प्लेमध्ये वॉटर-ड्रॉप नॉच स्टाइल दिला जाऊ शकेल. याबरोबरच या फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट असू शकेल.
यामध्ये 3GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज दिले जाण्याची अपेक्षा आहे. तसेच, 5000 mAh बॅटरीसह 10W चार्जिंग स्पीड मिळू शकेल. कॅमेर्याबाबत बोलायचे झाल्यास Samsung Galaxy F04 फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच यामध्ये डुअल रिअर कॅमेरा देखील येऊ शकतो. याबरोबरच यामध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.samsung.com/in/smartphones/
हे पण वाचा :
Jan Dhan Account उघडताच मिळतो 10 हजारांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
Bank Account शी मोबाईल नंबर लिंक करणे महत्त्वाचे का आहे??? जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
Bandhan Bank च्या ‘या’ FD वर आता मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर तपासा
Loan : फक्त 1% व्याजावर मिळेल कर्ज !!! अशा प्रकारे मिळवा फायदा