Samsung Galaxy M04 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, फिचर्स अन् किंमत पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Galaxy M04 : सध्याच्या काळात अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना जबरदस्त फीचर्स उपलब्ध करून दिले जात आहेत. अशातच आता Samsung कडून भारतात नुकताच Galaxy M04 हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये सेल्फी स्नॅपरसाठी वॉटरड्रॉप नॉच, दोन गोलाकार रिंग आणि बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेन्सर दिला गेला आहे. यासोबतच HD + रिझोल्यूशनचा 6.5-इंच डिस्प्ले आणि 5000 mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे. हा एक बजट स्मार्टफोन असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Samsung M04 India Launch date december 9 price specifications teased amazon Galaxy

Samsung कडून हा Galaxy M04 स्मार्टफोन मिंट ग्रीन, गोल्ड, व्हाइट आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8,499 रुपयांपासून सुरू होते. हे लक्षात घ्या कि, 16 डिसेंबरपासून ई-कॉमर्स वेबसाइट असलेल्या Amazon वर या फोनची विक्री सुरु होईल.

Samsung Galaxy A04e launched silently with dual cameras, 5000mAh battery

Galaxy M04 स्मार्टफोनबाबत जाणून घ्या

या Samsung Galaxy M04 मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसहीत 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल. त्याचा रीफ्रेश रेट 90Hz आहे. यामध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर मिळेल, जो IMG PowerVR GE8320 GPU, 4GB RAM आणि 128GB स्टोरेजसहीत लिंक केला गेला आहे. तसेच स्मार्टफोनची रॅम मायक्रोएसडी कार्डद्वारे 8 जीबीपर्यंत वाढवता येईल.

Samsung Galaxy M04 to launch in India soon - The 360 Tech

5000mAh ची पॉवरफुल बॅटरी

सॅमसंग हा फोन Android 12 आउट-ऑफ-द-बॉक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करेल. तसेच यामध्ये 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000mAh ची बॅटरी पॅक देण्यात आली आहे. तसेच सॅमसंग कडून या फोनसाठी दोन वर्षांच्या Android अपडेट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या Samsung Galaxy M04 फोनमध्ये 4G, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.

SAMSUNG GALAXY A04E 4G - Axiom Telecom

कॅमेरा सेटअपबाबत जाणून घ्या

या Samsung Galaxy M04 फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 13MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP सेकंडरी लेन्सचा समावेश आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी फोनच्या समोर 5MP स्नॅपर देण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, सध्या भारतात Galaxy M सीरीजचे अनेक स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत, यामध्ये Samsung Galaxy M13, Samsung Galaxy M33 5G आणि Samsung Galaxy M53 5G इत्यादींचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.samsung.com/in/smartphones/galaxy-m/m04/

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा