हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. याकाळात नागरिकांकडून जोरदार खरेदी केली जाते आहे. अशातच Amazon Flipkart सहित विविध प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती दिल्या जात आहेत. या दरम्यान, सॅमसंग इंडियाने Amazon आणि Flipkart वर सुरु असलेल्या सेलच्या पहिल्याच दिवशी 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या 12 लाख Galaxy स्मार्टफोन्सची विक्री केल्याचे सांगितले आहे. इथे हे लक्षात घ्या कि, सॅमसंगकडून नुकतेच आपल्या गॅलेक्सी सीरिजच्या स्मार्टफोन्सच्या किंमती 17 ते 60 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.”
याबाबत कंपनीने सांगितले की, “Samsung ने ऑनलाइन सेलच्या पहिल्याच दिवशी 12 लाखांहून जास्त गॅलेक्सी स्मार्टफोन्सची विक्री केली आहे. जो भारतातील एक नवीन विक्रम आहे. मूल्याच्या बाबतीत, सॅमसंगने गेल्या 24 तासांत 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे गॅलेक्सी हँडसेट विकले.”
Samsung Galaxy Series वर मिळते आहे प्रचंड सवलत
या फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी F23 5G हा स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच Samsung Galaxy F13 8,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे जाणून घ्या कि, Samsung ने Galaxy S20 FE 5G, Galaxy S22 Ultra, Galaxy S22, Galaxy M53, Galaxy M33, M32 Prime Edition आणि Galaxy M13 या स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये Samsung Galaxy S21 FE 5G साधारणपणे 74,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मात्र तोच फ्लिपकार्ट सेलमध्ये 31,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये OIS कॅमेरा आणि ड्युअल रेकॉर्डिंग फीचर आहे. तसेच पॉवरसाठी यामध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांना यामध्ये IP68 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स मिळेल.
याशिवाय, ग्राहक सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन Galaxy S22+ फक्त 59,999 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर आणि प्रो-ग्रेड ट्रिपल कॅमेरा सिस्टीम हे फिचर देण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/samsung-mobile-store
हे पण वाचा :
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3GB डेटा, अनलिमिडेट कॉलिंग सोबत मिळवा 84 दिवसांची व्हॅलिडिटी
45% सवलतीत Suzlon Energy चे शेअर्स खरेदी करण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या
Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकीची Grand Vitara लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ 2 मोठ्या बँकांच्या FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा