Sanjay Raut : संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार? मतदारसंघही ठरला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे ईशान्य मुंबई (North East Mumbai) या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशीही चर्चेला तयार आहे. असावेळी संजय राऊत जर खरच या मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरले तर ही त्यांची पहिलीच निवडणूक ठरेल.

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जातात. एकनाथ शिंदे यांच्यासहित 40 आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर सुद्धा संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत खंबीर पणे उभे राहिले. संजय राऊतांना आत्तापर्यंत शिवसेनेने 4  वेळा राज्यसभेवर पाठवलं असून दिल्लीतील शिवसेनेचा आवाज म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. परतू आता संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असं ठाकरे गटाला वाटत असून ईशान्य मुंबईतून त्यांनी उभं राहावं अशा चर्चा सुरु आहेत. ईशान्य मुंबईत सध्या भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत.

INDIA आघाडीकडून एकास एक उमेदवार उतरवण्याची स्टॅटेजी ठरली आहे. अशावेळी जर संजय राऊतांसाठी शिवसेनेने ईशान्य मुंबईची जागा आपल्याकडे घेतली तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस संजय राऊतांना पाठिंबा देईल. त्यातच शिवसेनेतील बंडखोरी मुळे उद्धव ठाकरेंकडे मात्तबर नेत्यांची कमी आहे. अशावेळी संजय राऊत यांनाच लोकसभेला उतरवून ठाकरे मोठा मास्टर प्लॅन खेळतील.