सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
वाळू तस्करांवर कारवाई करायला गेलेल्या तलाठ्याचे फिल्मी स्टाईलने वाळू माफियांनी अपहरण करण्यात आल्याची घटना मिरजेत घडली. तसेच मंडल अधिकाऱ्यांचे अपहरण करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला होता.
प्रवीण जाधव असं अपहरण करण्यात आलेल्या तलाठीचं नाव असून प्रवीणला ज्या ट्रकमधून अपहरण करून नेण्यात येत होते त्याचे अचानक टायर फुटले. त्यामुळे ट्रकचा वेग कमी होताच अपहरण करण्यात आलेल्या तलाठ्यांने जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून उडी मारली आणि आपला जीव वाचवला.
ही घटना मध्यरात्रीची असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अपहरण आणि शासकीय कामात अडथळा आणल्या बाबत गुन्हा दाखल करण्यातआल्याची माहिती मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
‘आजही गोडसे जिवंत’; जामिया गोळीबार प्रकरणी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
नागरिकत्व कायद्यामुळे महात्मा गांधींची इच्छा पूर्ण – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
..म्हणून विप्रोच्या ‘सीईओं’नी दिला आपल्या पदाचा राजीनामा