हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशिदींवरील भोंग्यावरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यभर आंदोलन केले. यात मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी याचाही समावेश होता. त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला. “आमच्यावरील गुन्हा खोटा होता. खोट्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस आम्हाला शोधत होते. आम्ही सरकारविरोधात बोलू नये म्हणून सरकारने दबाव बनण्यासाठी हे सगळे केले. ठाकरे सरकार सूडाचं राजकारण करत आहे” असा आरोप करत देशपांडे यांनी “महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचं दाखवलं तर मी राजकारण सोडेन,” असा इशाराही दिला.
संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, प्रथम त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आम्हाला अयोध्याला जाण्यासाठी मदत मागितली असती तर आम्ही केली असती असे राऊत म्हणाले आहरेत. त्यांच्या शिवसेनेकडून काय सहकार्य घ्यायचे?आमचे लोक रात्रीत चोरणाऱयांकडून काय सहकार्याची अपेक्षा करावी, असे म्हणत देशपांडे यांनी राऊतांना वाटोळा लगावला.
यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या धक्काबुक्की प्रकरणीही देशपांडे यांनी म्हायती दिली. यावेळी ते म्हणाले की, “माझ्याकडे एका चॅनलचे फूटेज आहे. त्याचे स्क्रीन शॉट काढले आहेत. बोलेसे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचा महिला पोलिसाला धक्का लागला. अशाप्रकारे सरकारने पोलीस स्टेशनवर दबाव बनवून फूटेजमधले शॉट्स कट करुन काहीतरी केले. गुन्हे दाखल करुन माझ्यावर राजकीय सूड उगवला गेला आहे. महिला पोलिसाला आमचा धक्का लागल्याचे एकतरी फूटेज दाखवले तर राजकारण सोडून देईन,” असा इशारा देत देशपांडे यांनी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला आतापर्यंत सक्तीच्या रजेवर का पाठवलं आहे, असा प्रश्नही विचारला.