बऱ्याच वर्षांनी कुंभकर्णाची झोप मोडली; मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंड्ळाच्या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. यावेळी राज्यातील दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “बऱ्याच वर्षांनी कुंभकर्णाची झोप मोडली. त्याबद्दल कुंभकर्णाचे अभिनंदन,” असा टोलाही देशपांडे यांनी लगावला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाल की, काल राज्य मंत्रिमंड्ळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घ्यायला उशीरच झाला. कारण निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाला असल्याचा टोलाही यावेळी देशपांडे यांनी लगावला.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर अनेक कारणांनी निशाणा साधला गेला आहे. मुंबईतील हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित राहण्याच्या चर्चेवरूनही देशपांडे यांनी जोरदार टोलेबाजी केली होती. मुख्यमंत्री विधिमंडळ अधिवेशनाला जाणार म्हणून वर्षा ते विधिमंडळ रस्ते गुळगुळीत केले. आता उद्धव ठाकरे यांनी राज्यभर प्रवास करावा. त्यामुळे तिथलेही रस्ते गुळगुळीत होतील, असा टोलाही देशपांडे यांनी लगावला होता.