हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्रमध्ये महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्यातही मुसळधार पाऊस व दरडी कोसळून नागरिकांचे जीव गेले. तर घरांचे नुकसान झाले या ठिकाणी जाताना हवामानाचत बिघाड झाल्याने मुख्यमंत्री ठाकरे याना दौरा अचानक रद्द करावा लागला. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावे, असे म्हंटले. यावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी “जिथे मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोचणार,” असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंना लगावला आहे.
राज्यात आगामी महानगरपालिका तसेच नगरपालिका निवडणूक येणार आहेत. त्या दृष्टीने अनेक पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज नाशिक इथे महत्वपूर्ण घोषणा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावे, त्यांच्यात क्षमता आहेत, असे म्हटले होते. राऊतांच्या या विधानावरून देशपांडेंनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देशपांडे यांनी नाशिक दौऱ्याला सुरुवात केली आहे. या ठिकाणी मनसे स्वतंत्रपणे महापालिकेचे निवडणूक लढणार असल्याचे घोषणाही यावेळी देशपांडे यांनी यावेळी केली आहे.