संगममाहुली येथील स्मशानभूमी पुराच्या पाण्यात बुडाली : कोरोनाग्रस्तांच्या अत्यसंस्कारचा प्रश्न निर्माण, पर्यायी व्यवस्था अद्याप नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने साताऱ्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. आज साताऱ्यातील कृष्णा नदीला पूर आल्याने सातारा येथील संगम माहुली येथील स्मशानभूमी मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. या पाण्यात येथील 14 अग्निकुंड हे पाण्याखाली गेले आहेत. या 14 अग्निकुंडात प्रामुख्याने करोनाबाधित मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे आता अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सातारा शहरासह कोरोना बाधित मृत्यू झाल्यास त्यांच्या अत्यसंस्कारासाठी असलेली कैलास स्मशानभूमी पावसाच्या पाण्यात बुडाली आहे. गेल्या 24 तासात होत असलेल्या पावसाने कृष्णा नदीला पूर आलेला आहे. या पूरात स्मशानभूमी बुडाली असून सातारा तहसिलदार यांनी केवळ पाहणी केली. मात्र पर्यायी व्यवस्था या संदर्भात प्रशासनाची कोणतीच व्यवस्था नसल्याने निष्क्रियतेचा फटका अत्यंविधीला बसणार आहे.

https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/315958340223797

क्षेत्रमाहुली येथील कृष्णा नदीकाठी बालाजी चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने अद्यावयत अशी कैलास स्मशानभूमी उभारण्यात आलेली आहे. रात्री अचानक कृष्णा नदीला पूर आल्याने ही अग्निकुंडात पाण्याखाली गेली आहेत. येथे काल अंत्यसंस्कार केलेल्या कोरोनाबाधित मृतांच्या अस्तीही वाहून गेल्या आहेत. आज अंत्यसंस्कार करण्यासाठी ठेवलेली लाकडे सुद्धा वाहून गेले आहेत. आज कण्हेर व धोम धरणातून सुद्धा पाणी सोडण्यात येणार आहे. दोन्ही धरणातील सोडलेले पाणी याच नदीला मिळत असल्याने आणखीन मोठ्या प्रमाणात या नदीला पूर येणाची शक्यता आहे. कोरोना बाधित रुग्ण मृत्युमुखी पडलेला रुग्णांवर येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत, यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रश्न निर्माण झाला आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्मशानभूमीत गेले वर्षभर शेकडो मृत बाधितांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. या स्मशानभूमीमुळे प्रशासन निवांत होते. मात्र आता पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रशासन काय भूमिका घेणार. तसेच अद्याप पर्यायी व्यवस्थेचा प्रशासनाने विचार का केला नव्हता असे प्रश्न निर्माण होत आहेत. सातारच्या तहसिलदार मॅडम यांनी पूराच्या तडाख्यात सापडलेली कैलास स्मशानभूमीची पाहणी केली, मात्र पर्यायी व्यवस्था काय हे मात्र सांगू शकल्या नाहीत.