संगमनेर : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. तरीदेखील राज्यातील गुन्हे काही थांबताना दिसत नाही आहे. भोंदूबाबा नागरिकांमधील अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत आहेत. असाच एक प्रकार संगमनेरच्या पारेगाव बुद्रूक या गावात घडला आहे. भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका मांत्रिकाने महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाला अटक केली आहे.
काय आहे प्रकार
पारेगाव बुद्रुक गावामधील एका महिलेला गेल्या अनेक दिवसांपासून काही त्रास होत होता. पण त्या महिलेच्या घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी तिला अंधश्रद्धेला बळी पडत एका भोंदूबाबाकडे घेऊन गेले. त्या भोंदूबाबाचे नाव सावित्रा गडाख आहे. त्याने त्या महिलेला तुझ्यावर भूतबाधा झाली आहे. तुझ्या अंगातलं भूत काढावे लागेल असे त्या महिलेला सांगितले. महिलेनेही त्या मांत्रिकांवर विश्वास ठेवत आपल्याला खरंच भूतबाधा झाली आहे, यावर विश्वास बसला.
यानंतर महिला आपल्या पतीसोबत भूतबाधा उतरवण्यासाठी त्या मांत्रिकाकडे गेली. त्यानंतर त्या मांत्रिकाने त्या महिलेला बळजबरी दारू पाजली. त्यानंतर त्या महिलेला शेतामध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केले. या सर्व प्रकरणानंतर महिलेने मांत्रिकाच्या विरोधात संगमनेर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्या मांत्रिकाला अटक केली आहे.