सांगली जिल्ह्याची रुग्ण संख्या बाराशे पार : नवे 1 हजार 218 पाॅझिटीव्ह, तर 1 हजार 256 कोरोनामुक्त

Sanagli Corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी होत असतानाच शुक्रवारी जिल्ह्याची रुग्ण संख्या हि 1200 च्या जवळ पोहोचली. चोवीस तासात कोरोनाचे नवे 1 हजार 218 रुग्ण आढळून आले. तर 36 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1 हजार 256 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 151 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 27, कडेगाव 127, खानापूर 81, पलूस 70, तासगाव 111, जत 92, कवठेमहांकाळ 77, मिरज 140, शिराळा 148 आणि वाळवा तालुक्यात 194 रुग्ण आढळले. तसेच म्युकर मायकोसिसचे नवे चार रुग्ण आढळले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत म्युकरच्या 114 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय.

कोरोना संशयित रुग्णांची मागील चोवीस तासात जिल्ह्यातील 7 हजार 321 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 2652 पैकी 613 बाधित तर 4369 अँन्टीजेन चाचणीमध्ये 656 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1218 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील 36 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 6, मिरज शहर 1, जत तालुक्यात सर्वाधिक 11, वाळवा 9, तासगाव 3, खानापूर आणि मिरज प्रत्येकी 2, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बाधित रुग्णांपैकी 1256 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले.

महानगरपालिका क्षेत्रात रुग्णवाढ शुक्रवारी कमी झाली. नव्याने 151 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 118 तर मिरज शहरात 33 रुग्ण आढळले. तर आटपाडी तालुक्यात 27, कडेगाव 127, खानापूर 81, पलूस 70, तासगाव 111, जत 92 कवठेमहांकाळ 77, मिरज 140, शिराळा 148 आणि वाळवा तालुक्यात 194 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 34, सोलापूर 3, कर्नाटक 9, सातारा जिल्ह्यातील 3 तर रायगड जिल्ह्यातील दोन रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1 लाख 15 हजार 436 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 3 हजार 337 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 99 हजार 384 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 12 हजार 715 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 10 हजार 67 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.