सांगली जिल्हा ः कोरोनाचे नवे 2 हजार 46 रुग्ण तर 45 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | जिल्ह्यात कोरोनाने उद्रेक झाला असताना शुक्रवारी रुग्णसंख्या स्थिर झाल्याने काहीसा मिळाला. चोवीस 2 हजार 46 रुग्ण आढळून आले. तर 45 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1 हजार 169 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 297 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 218, कडेगाव 89, खानापूर 227, पलूस 91, तासगाव 136, जत 265, कवठेमहांकाळ 92, मिरज 286, शिराळा 65 आणि वाळवा तालुक्यात 280 रुग्ण आढळले.

मागील चोवीस तासात जिल्ह्यातील 6 हजार 816 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 2980 पैकी 1129 बाधित तर 3836 अँन्टीजेन चाचणीमध्ये 1008 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 2046 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील 45 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 3 आणि मिरज शहर 6, तासगाव तालुक्यातील 7, जत तालुका 6, वाळवा 5, कडेगाव व पलूस तालुका प्रत्येकी 4, कवठेमहांकाळ व शिराळा प्रत्येकी 2 आणि आटपाडी व खानापूर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बाधित रुग्णांपैकी केवळ 1169 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले.

महानगरपालिका क्षेत्रात रुग्णवाढ शुक्रवारी स्थिर झाली. नव्याने 297 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 156 तर मिरज शहरात 141 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 218, कडेगाव 89, खानापूर 227, पलूस 91, तासगाव 136, जत 265, कवठेमहांकाळ 92, मिरज 286, शिराळा 65 आणि वाळवा तालुक्यात 187 280 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 21, सोलापूर 23, कर्नाटक 25, सातारा जिल्ह्यातील 17, पुणे 2, मुंबई, रत्नागिरी आणि उत्तरप्रदेशातील प्रत्येकी एक रुग्ण आढळला. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 87 हजार 693 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 556 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 68 हजार 403 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 13 हजार 331 कोरोना बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Comment