सांगली | जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होत असताना मंगळवारी सुद्धा नव्या रुग्णांपेक्षा रेकॉर्डब्रेक कोरोनामुक्त झाले. चोवीस तासात 2 हजार २७ जणांनी कोरोनावर मात केली. नवे १ हजार २५८ रुग्ण आढळले तर ४६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे १४० रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ४५, कडेगाव ९४, खानापूर ६३, पलूस ९४, तासगाव १०६, जत १५७, कवठेमहांकाळ ५३, मिरज १२०, शिराळा १२९ आणि वाळवा तालुक्यात २५७ रुग्ण आढळले.
कोरोना संशयित रुग्णांची मागील चोवीस तासात जिल्ह्यातील ५ हजार ७७८ रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या १७२५ पैकी ४३८ बाधित तर ४०५३ अँन्टीजेन चाचणीमध्ये ९१४ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून १२५८ जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील ४६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर २, कुपवाड आणि मिरज शहर १, तासगाव दहा, वाळवा ९, कडेगाव १, खानापूर 6, पलूस २, जत ४, कवठेमहांकाळ २, मिरज तालुक्यातील ५ तसेच शिराळा तालुक्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्या रुग्णांपेक्षा २ हजार २७ बाधित रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली.
महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्या कमी झाली. नव्याने १४० रुग्ण आढळून आले. सांगली शहरात ५६ तर मिरज शहरात ५४ रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात ४५, कडेगाव ९४, खानापूर ६३, पलूस ९४, तासगाव १०६, जत १५७, कवठेमहांकाळ ५३, मिरज १२०, शिराळा १२९ आणि वाळवा तालुक्यात २५७ रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ६६, सोलापूर ५, कर्नाटक १८, सातारा जिल्ह्यातील १, पुणे जिल्ह्यातील ३ आणि जालना जिल्ह्यातील एक रुग्ण आढळला. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1 लाख २ हजार ९०६ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ३ हजार १६ व्यक्तींचा मृत्यू झाला असून ८५ हजार ५५३ जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ हजार ३३७ रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी ११ हजार २५६ बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.