सांगली : शहरातील वसंतदादा मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर आज सशस्त्र दरोडा टाकत कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. पोलिस असल्याचा बनाव करून पेढीत शिरलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून, तोंडावर चिकटपट्टी लावून कानपटीवर बंदूक ठेवत दागिने, हिरे आणि चोख सोन्यावर दरोडा टाकला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे डीव्हीआर फोडून टाकत पुरावे नष्ट करण्याचा असफल प्रयत्न केला. भर दुपारी तीन वाजता अर्धा तास हा भयानक प्रकार घडला. त्याची माहिती मिळताच सांगली हादरून गेली.
सांगली मिरज रोडवरील मार्केट यार्डनजीक वसंत कॉलनीत रिलायन्स ज्वेल्स पेढी आहे. दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी गाडीतून सुमारे आठ ते दहाजण दुकानात ग्राहक म्हणून आले. त्यातील चौघेजण दुकानाच्या बाहेर थांबले. सहाजण दुकानात शिरले. त्यावेळी दुकानात काही ग्राहक खरेदीसाठी आले होते.
दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर ‘आम्ही पोलिस आहे, तपासणी करायची आहे’, असे म्हणून बंदुक बाहेर काढली. दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांना एका जागी उभा केले. कामगार आणि ग्राहकांचे हातपाय बांधले. तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यांना एका खोलीत डांबून ठेवले. यानंतर दुकानात, शोकेस, लॉकर, डिस्प्लेला लावलेले दागिने व हिरे काढून एका मोठ्याj सर्व सुरू असतानाच एक ग्राहक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तो पडला आणि जखमी झाला. त्या ग्राहकाच्या दिशेने दरोडेखोराने गोळीबार केला. त्याची पुंगळीही त्याठिकाणी पडली होती. दुकानातील सर्व सोने लुटून दरोडेखोरांनी एका गाडीतून पलायन केले. दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली.