हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सोपा आणि खिशाला परवडणारा आहे. त्यामुळे अनेक भारतीय हे प्रवास लांबचा असो वा जवळचा रेल्वेनेच जाणे पसंत करतात. यामुळे रेल्वे विभागाला आर्थिक फायदा होतो आणि प्रवाश्यांना इतर सोयी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली रेल्वे स्टेशनने (Sangli Railway Station) मोठा विक्रम केला आहे. २०२३ मध्ये सांगलीच्या रेल्वे स्टेशन मधून तब्बल 12 लाख प्रवाश्यांनी प्रवास केला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत झाली वाढ
12 लाख प्रवाश्यांनी प्रवास केल्यामुळे सांगली रेल्वेस्थानकाने एक विक्रमी आकडा मिळवला आहे असे म्हणता येईल. कारण मागील वर्षीच्या तुलनेत आरक्षित जागेच्या तुलनेत ही वाढ 80 टक्क्याएवढी आहे. त्यामुळे हा आकडा मोठा आहे. एप्रिल 2023 ते 30 ऑक्टोबर 2023 या दरम्यान सांगली स्थानकावरून 3 लाख 45 हजार तिकिटांची विक्री करण्यात आली. यामध्ये बाहेरगावून 3 लाख 8 हजार प्रवासी गणले गेले तर प्लॅटफॉर्म तिकीट काढणाऱ्यांची संख्या ही 27 हजार 500 एवढी होती. त्याचबरोबर एकूण 4.5 लाख पासधारकांनी सांगली स्टेशन वरून सात महिन्यांमध्ये प्रवास केला आहे. तर आरक्षित तिकिटांची संख्या ही 2022 मध्ये 90 हजारावर गेली होती. तर यावर्षी हीच संख्या 94 हजार 321 केवळ सात महिन्यात गेली आहे. त्यामुळे हे सांगली रेल्वे स्थानकाचे यश म्हणावे लागेल. या वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे गाड्यांची मागणी वाढत आहे.
नवीन गाड्या सुरु करण्याची केली जातीये मागणी
सांगली रेल्वे स्थानकावरील दिवसागणिक वाढत चाललेल्या संख्येमुळे इतर नव्या गाड्या सोडण्याची मागणी केली जात आहे. त्यामध्ये पंढरपूर, सोलापूर, बेळगाव, हुबळी, गुहागर, बंगळूर, चेन्नई या ठिकाणी जाण्यासाठी गाड्यांची मागणी होत आहे. या गाड्या सोडण्यात आल्या तर सध्या असलेल्या प्रवाशी संख्येपेक्षा ती अधिक असेल आणि त्याचा फायदा रेल्वेलाच होईल. हे नक्की.