संजय राठोड मीडिया ट्रायलचे बळी- विजय वडेट्टीवार

चंद्रपूर । पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी चंद्रपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती असल्याचेही ते म्हणाले.

”भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजप नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन योग्य केले. लवकरच याप्रकरणातील सत्य बाहेर येईल, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

राज्याचे कृषीमंत्री आणि शिवसेना नेते दादा भुसे यांनीही संजय राठोड यांच्याविषयी सावधपणे प्रतिक्रिया दिली. संजय राठोड हे आमचे सहकारी मित्र आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीही माहिती नाही. जी वस्तुस्थिती आहे, ती चौकशीनंतर समोर येईल, असे दादा भुसे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

You might also like