हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारवर शेतकरी आंदोलन, ‘पेगॅसस’ अशा मुद्द्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल केंद्र सरकारवर निशाणा साधल्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयावरून राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ” सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारच्या खिशात असल्याचे राऊतांनी यावेळी म्हंटले.
दिल्ली येथे आज विरोधी पक्षांनी बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी आशावाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, गेल्या आठवडाभरापासून विरोधी पक्षांकडून शेतकरी आंदोलन, ‘पेगॅसस’ या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, मोदी सरकार काहीही एकूण घेत नाही. आता या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयातच जाणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे कि ‘पेगॅसस’ हा विषय गंभीर असेल तर चौकशी करणे गरजेचे आहे.
मात्र, हे सरकार विरोधकांप्रमाणे सर्वोच्च न्यायलयाचेही ऐकत नसल्याचे दिसते. संसद, न्यायालय, प्रशासन आणि माध्यमे कोणाच्याही संदर्भात या मोदी सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचे सरकार ऐकायला तयार नसेल तर, सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे या भूमिकेत मोदी सरकार आहे, अशी टीका राऊतांनी यावेळी केली.