संजय राऊत आणि मित्र परिवाराचा 100 कोटींचा घोटाळा; सोमय्यांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत आणि त्यांचे मित्र सुजित पाटकर यांचा 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा आहे असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलूंड येथील कोव्हिड केंद्रांवर सुजीत पाटकर यांच्या कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर्स पुरवले जायचे. या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

दरम्यान, यापूर्वी संजय राऊत यांचे जवळचे असलेले उद्योजक प्रवीण राऊत यांना ईडी ने मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल करत अटक केली होती. प्रवीण राऊत यांच्यावर १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या नातेवाईकांवर एकामागून एक चौकशी होत असताना आता राऊतांकडून नेमकं काय प्रत्युत्तर येत हे पाहावे लागेल.