व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

संजय राऊत भगवान है : छ. उदयनराजेंचा खोचक टोला

दिल्ली | दिल्ली येथे आज भाजप राज्यसभा खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संजय राऊत भगवान है और क्या, त्याच नाव घेवू नका. त्याच्यावर बोलून माझा तोंड खराब करायचा नाही, असा खोचक टोला मारला.

महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छ. उदयनराजे भोसले यांची भेट झाली. तसेच चर्चाही झाली. या भेटीनंतर खा. उदयनराजे म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून निवडूण दिल्यानंतर कामे होत नसतील तर बाजूला गेलेले कधीही चांगलचं असतं. शिवसेनेचे चिन्ह व पार्टी संपेल असे वाटत नाही, कारण एकनाथ शिंदे व त्याच्यासोबतचे आमदार, खासदार हे सुध्दा शिवसेनाच आहे.

संजय राऊत शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही असे म्हणत असल्याचा प्रश्न छ. उदयनराजे यांना माध्यमांनी विचारला. त्यावर संजय राऊत भगवान आहेत, त्याच्याविषयी प्रश्न विचारून माझे तोंड खराब करू नका असे, छ. उदयनराजे म्हणाले.