कंगणाने हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर बोललं पाहिजे ; संजय राऊतांच चॅलेंज

kangana and sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांत आत्महत्या प्रकरणात सातत्याने विधान करणाऱ्या कंगना राणावतने आता हाथरस प्रकरणावर बोलले पाहिजे. बलरामपूरमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावर बोलले पाहिजे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

कंगना राणावत आता कुठे बोलताना काही दिसत नाही.  या नटीने हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर बोलले पाहिजे. बलरामपूरमध्ये झालेल्या घटनेवरही बोलले पाहिजे. कंगनाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. तेव्हा काही सामाजिक संघटना पुढे आल्या होत्या. त्या सर्व लोकांना उत्तर प्रदेशला हाथरस इथं पाठवले पाहिजे.  या लोकांना हाथरसचे तिकीट दिले पाहिजे, तिथे कसे जायचे कुठे राहायचे, याची माहिती आपण देणार आहोत’, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

सुशांत आत्महत्या प्रकरणी राज्यात ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण आता ज्या लोकांनी हा खड्डा खोदला होता, त्यातही लोकं पडली आहे आणि राज्यातील जनतेनं त्या खड्ड्यात माती टाकून थडगे बांधले आहे’, अशी जळजळीत प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’