‘ते’ 12 जण गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का? आमदारांच्या नियुक्ती वरून राऊतांचा सवाल

raut and koshyari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यपालांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का अस विचारत जी 12 जणांची नावे आम्ही आमदार नियुक्ती साठी दिली ते काही गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का असा सवाल संजय राऊतांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

12 आमदारांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांसह मविआच्या नेत्यांनी कोश्यारींची भेट घेतली. त्याबाबत संजय राऊत म्हणाले, “भेटी संदर्भात निर्णय काय लागेल हे राज्यपालांनी आपल्या कृतीतून दाखवायला हवं. काल मुख्यमंत्री, अजित पवार, बाळासाहेब थोरात हे राज्यपालांना भेटले त्यांचे हसरे चेहरे सर्वांनी पाहिले, त्यामुळे तिकडचा माहोल किती सकारात्मक होता हे समजले असेल.

ते पुढे म्हणाले, राज्यपालांवर जर कोणाचा राजकीय दबाव असेल तर तस त्यांनी स्पष्ट करावे. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर बारा आमदारांची नियुक्ती करणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे तरीही त्यांनी अजून मंजुरी का दिली नाही. ही जी नावे आम्ही दिली ते काय गुंड , बदमाश किंवा अफगाणिस्तान मधील तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.