हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार हे छोटे नेते आहेत अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केल्यानंतर त्यांना रोषाला सामोरे जावे लागतय.आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते पातळी सोडून टीका करत आहेत. शरद पवारांना जे छोटे नेते बोलत आहेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही.शरद पवार छोटे नेते असतील तर मग नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला मग मोदी सरकारला कळत नाही का?”, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
“शरद पवार यांच्यासारख्या नेत्यावर अशा प्रकारची टीका करणे म्हणजे तुमचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. सत्ता येते जाते. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या सारख्या नेत्यांची उंची कोणी काही बोललं म्हणून कमी होत नाही”, असं संजय राऊत म्हणाले
संजय राऊत पुढे म्हणाले, शरद पवारांना जे छोटे नेते बोलत आहेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही. इतक्या छोट्या नेत्याला मोदी यांच्या सरकारने भारतरत्न नंतरचा सर्वात मोठा नागरी सन्मान दिला आहे. सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रालीत महान योगदानासाठी हा पुरस्कार दिला आहे. हे चंद्रकांत पाटील यांना माहिती नसावं. माहिती नसेल तर पीएमओकडून माहिती घ्यावी. याच छोट्या नेत्याचा अनेक वर्ष नरेंद्र मोदी सल्ला घेऊन गुजरात आणि देशाचा कारभार करत होते, आजही करत असावेत. बहुदा चंद्रकांत पाटील आणि भाजपामध्ये वैचारिक दरी निर्माण झाली आहे. किंवा मोदी सांगत आहेत तो संदेश यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. किंवा मोदींना हे जुमानत नाही असं दिसत आहे. तुम्ही राजकारण करा पण वैयक्तिक स्तरावर उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबद्ल इतक्या खालय्चा स्तरावर येऊन बोलू नका”.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील-
शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका पाटील यांनी केली होती. राजकारणात येण्यापूर्वी पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’