हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाकडून समन्स पाठवण्यात आले आहे. 30 मार्च 2018 मध्ये राऊत यांनी बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांना समन्स पाठण्यात आले असून 1 डिसेंबरला बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूमध्ये एक खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात कर्नाटक आणी महाराष्ट्रवाद पेटला असताना बेळगाव कोर्टाकडून राऊतांना समन्स बजावण्यात आले आहे.
नेमकं राऊत काय म्हणाले?
बेळगाव न्यायालयाकडून समन्स बजावल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सीमा भागातील लोकांच्या मागे शिवसेना उभी आहे, सीमा भागातील लोकांवर हल्ले केले, कायद्याची भिती दाखवली, तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील मी केलेल्या भाषणात प्रक्षोभक काय आहे हे मला अजून माहित नाही. २०१८ च्या भाषणाची दखल आत्ता घेत मला समन्स पाठवण्यात आलं आहे. मी कोर्टात जावं आणि तिथे माझ्यावर हल्ला व्हावा आणि मला अटक करण्यात यावं तुरूंगात टाकावं अशा प्रकारचं कारस्थान माझ्या विरोधात चालू असल्याचं माझ्या कानावर आले असल्याचे राऊत यांनी सांगितले.