ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट

SANJAY RAUT
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल महाराष्ट्रातील 10 वाहनांवर बेळगावमधील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक असे ट्विट करत शिंदे-फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. पण दिल्लीच्या पाठिंब्या शिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. ऊठ मराठ्या ऊठ !, असे ट्विट राऊतांनी केले आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे.

कर्नाटकात जो काही हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे त्यामागे कोणीतरी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. अशात संजय राऊत यांनी थेट केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहार. दिल्लीच्या पाठिंब्या शिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झाला असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.