पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच राऊतांनी केले ‘हे’ पहिले महत्वाचे विधान; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी भाजपचे ‘साडे तीन’ नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केला. दरम्यान त्यांच्याकडून दुपारी पत्रकार परिषद घेऊन नावे जाहीर करणार असे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सुरुवातीला महत्वाचे आणि मोठे विधान केले. “जय महाराष्ट्र, आजची पत्रकार परिषद हेच सांगण्यासाठी घेतली आहे कि आम्ही कुना गांडूची औलाद नाही. आज खोटे आरोप करून बदनामी केली जात आहे. त्यातून केंद्रीय तपासाचा वापर केला जात आहे. भाजपतील प्रमुख नेते रोज तारखा का देत आहेत? असे महत्वाचे विधान राऊत यांनी केले आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी ते शिवसेना भवन येथे दाखल झाले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी शिवसैनिकांना हात उंचावून प्रतिसाद दिला. राऊत यांनी ठीक चार वाजता पत्रकार परिषदेस सुरुवात केली. यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेना भावनाने अनेक लढे बघितले आहेत. आदरणीय बालासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मन्त्र दिला. ते नेहमी सांगायचे तू जर काही पाप केले नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका. महाराष्ट्रावर तसेच महाराष्ट्रातील मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरु आहे. त्याविरुद्ध कुणी तरी आक्रमण करणे गरजेचे होते. ते करण्यासाठी मला पाठींबा देण्यात आला आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेस राऊत यांच्यासह खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार धैर्यशील माने, अनिल देसाई, मंत्री उदय सामंत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आनंदराव अडसूळ, आदेश बांदेकर आदींची उपस्थिती होती.