हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. उध्दव ठाकरे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा आहेत. दरम्यान या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर गंभीरपणे विचार करत आहेत. मराठा आरक्षणावर काळजीपूर्वक काम करत आहेत. असे संजय राऊत यांनी म्हंटल.
दरम्यान, पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत वर्षावर चर्चा केली. मराठा आरक्षणासोबत राज्याशी संबंधित अन्य मुद्द्यांवरही पवार व ठाकरे यांच्यात चर्चा झाली.