हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोदी – शहांनी भरपूर जोर लावूनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेस ने तब्बल 231जागा जिंकून बंगाल मध्ये एकहाती सत्ता काबीज केली. आणि भाजपला आणि विशेषतः मोदी-शहांना अस्मान दाखवले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदी – शहांच्या पराभवाची कारणे सांगितली.
भाजपाने देशातील राजकीय संस्कृती व परंपरांचे मारेकरी ठरू नये. प. बंगालात परंपरा मोडली, याचा फटका भाजपला बसला हे स्वीकारा. ममता बॅनर्जी यांच्या समोर ‘श्रीराम’चा नारा दिला. तोदेखील चालला नाही. याचे कारण असे की, प. बंगालात ‘जय श्रीराम’चे आकर्षण कधीच नव्हते. तेथे दुर्गा पिंवा कालिमातेचे वलय. भाजपाने श्रीरामास प्रचारासाठी प. बंगालच्या रस्त्यांवर आणले, पण देवांशू भट्टाचार्य या फक्त 25 वर्षांच्या तरुणाने ‘खेला होबे’ हे गीत तृणमूलसाठी प्रचारात आणले. त्या ‘खेला होबे’ने ‘जय श्रीराम’च्या नारेबाजीवर मात केली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालात राज्यक्रांती होत आहे, असे स्फोटक वातावरण बनवले. पण भाजपला 80 जागाही जिंकता आल्या नाहीत व ममता बॅनर्जी या 215 जागा जिंकून वरचढ ठरल्या. यावर कोलकाताच्या एका बंगाली संपादकाने मला फोन करून सांगितले, ”महाराष्ट्राप्रमाणेच बंगालातही चाणक्याचे काहीच चालले नाही. एकच खरा चाणक्य आहे. त्याचे नाव पंडित विष्णुगुप्त. बाकी सगळे झूठ आहेत!’ पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल हे एकतर्फी नाहीत. देशात मोदींची लाट ओसरली आहे व अमित शहा यांनी शर्थ करूनही त्यांना प. बंगालात मोठा विजय मिळवता आलेला नाही, हे या निवडणुकांनी दाखवून दिले.
संपूर्ण तृणमूल काँग्रेस फोडण्यात आली. तृणमूलचे नटबोल्ट ढिले केले. तृणमूलमधून फुटलेल्या आमदार व मंत्र्यांना उमेदवाऱयांची रेवडी वाटली. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी व एक मुकुल रॉय सोडले तर इतर सगळे पराभूत झाले. या सगळय़ांसाठी मोदी-शहा व योगी आदित्यनाथ यांनी हजारोंच्या सभा घेतल्या. प. बंगालातील एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱयास मी निकालाच्या रात्री फोन करून विचारले, ”भाजपचा हा पराभव दारुण आहे, पण मोदी-शहांच्या सभांत व रोड शोना तर रोज तुफान गर्दी होत होती. त्या गर्दीचे पुढे काय झाले?” त्या अधिकाऱयाने एका वाक्यात स्पष्ट केले, ‘ही गर्दी स्थानिक नव्हती. झारखंड, बिहार, ओडिशा या बंगालच्या सीमेवरील राज्यांतून रोज गर्दी विकत आणली जात होती!
मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकांत अशा खालच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये. हे प. बंगालात दिसले. लोक मग पंतप्रधानांचा पराभव करतात. अमित शहा यांनी उभे केलेले कोणतेही मुद्दे प. बंगालात चालले नाहीत व देशभरातून गोळा केलेली भाजपची फौज प. बंगालातून पराभूत होऊन परत फिरली. हे पानिपतच्या लढाईसारखेच झाले. लोकशाहीतील सर्व परंपरा येथे मोडून पडल्या. असेही राऊतांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.