हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre Video) यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी आमच्या कार्यकर्त्याचा काय संबंध? सार्वजनिक ठिकाणी मुका घ्यायला आम्ही सांगितलं होतं का? असा सवाल करत आधी हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याची चौकशी करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात मुका घ्या मुका नावाचा सिनेमा चालू आहे. परंतु या प्रकरणात तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करताय? त्यांचा संबध काय आहे? हा सत्तेचा गैरवापर आहे. तुम्हाला सार्वजनिक कार्यक्रमात मुका घ्यायला आम्ही सांगितलं होतं का? मुळात तो व्हिडिओ खरा आहे कि खोटा याची चौकशी करा. तो विडिओ संबंधित आमदाराच्या मुलाने शेअर केला आहे. त्याला तुम्ही का अटक केली नाही असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी; सत्तेचा डाव कोणावर पलटणार?
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/2OUZHmw5e0#Hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 15, 2023
मुका घेणारेच पहिले गुन्हेगार आहेत. आज जर दादा कोंडके असते तर त्यांच्यावर सिनेमाच काढला असता. तुम्ही काहीही करा, तुम्ही मुके घ्या किंवा मिठ्या मारा हा तुमचा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जर अश्लील वर्तन करत असाल आणि त्याच्यावर कोणाचा आक्षेप असेल तर तुम्ही आमच्या लोकांना अटक का करताय? तुम्ही धमक्या का देताय? ही काय मोगलाई चालू आहे का? तुम्ही मुके घेतले , तुमचं तुम्ही निस्तरा. आमच्यावरती बोट दाखवू नका अस म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.